Tuesday, March 3, 2020

तिचं आणि फक्त तिचं...

माझ्या #स्त्रीत्व या मालिकेतील शेवटचे पुष्प...

तिचं स्वत्व... 
जे तिची स्वतंत्र ओळख निर्माण करते... 


तिचं सुख... 
जे ती प्रत्येकाच्या डोळ्यांत पाहू इच्छिते...


तिचे सामर्थ्य... 
ज्यावर कोणी यत्किंचितही शंका घेऊ नये...


तिचं रूप..
जे क्षणाक्षणाला बदलत असतं आणि आणखीनच बहरत जातं


तिचं सौंदर्य ... 
जे तिच्या प्रत्येक रूपात अधिकाधिक बहरतच जातं...


तिचं दुःख... 
जे ती चारचौघांत दाखवत नाही... 


No comments:

Post a Comment