Saturday, February 8, 2020

कलाकृती...

कथेतून जन्म घेते संहिता, संहितेतून उभी राहते कलाकृती,
सशक्त अभिनयातून जन्माला येतात पुरुष आणि प्रकृती.
अनेक हातांनी घडतो तो एक संस्कार,
साकारतो रंगमंचावर एक अद्भुत अविष्कार.
तिसरी घंटा होते अन् रंगमंचाचा पडदा उठतो,
रसिकांच्या चरणी एक नवे पुष्प वाहतो.
कथानक वेग पकडताच मध्यांतर होते,
पूर्वार्धाच्या शेवटाला कलाकृती नवा जन्म घेते.
उत्तरार्धाचाही होतो मग शेवट अन् नाट्यावर पडदा पडतो,
रसिकांच्या मनावर कलाकृतीची छाप पाडतो.
रंगमंच सोडताना कलाकाराचा एक प्रवास संपतो,
नव्या कलाकृतीला कलाकार नव्याने साद घालतो.
प्रत्येक कलाकृतीगणिक कलाकारांसोबत समृद्ध होते नाट्यकला,
रंगदेवतेच्या आशीर्वादाने जन्माला येतात अवलिया.
                                                                     - श्वेता


No comments:

Post a Comment