Saturday, November 23, 2019

अश्रू वाहण्या आता काही कारण उरले नाही...

अश्रू तरळले डोळ्यांत असे काय कारण घडले,
या नियती पुढे कधी कोणाचे काय चालले.
उफाळून आला राग आणि कवटाळले दुःख तू,
हृदयी उठल्या वादळात उभी स्तब्ध निश्चल तू.
चक्र भावभावनांचे तर अखंड फिरत राहते,
दुःखानंतर सुखाची वाट पाहणे फक्त उरते.


शुभ्र कॅनवासवर चढ़लेले रंग ही असतात कधी गडद कधी फिके,
खेळ नियतीचे कधी करिती निशब्द तर कधी कायमचे मुके.
हाती नाही आपुल्या जे त्या मागे धावणे केवळ व्यर्थ,
झटकून सारी नकारात्मकता शोध तू एक नवा अर्थ.
थांबव तो आक्रोश आता अश्रूंना तू बांध घाल,
मांड नव्याने डाव तू, खेळ तू आता नवी चाल.
जगाची ही रीत अशी दुःखामागून सुख येई,
अश्रू वाहण्या आता काही कारण उरले नाही.
                                                             -श्वेता

No comments:

Post a Comment